कलाकौशल्य ग्रुप बद्दल थोडेसे...

आपल्या कलाकौशल्य ग्रुपच्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! 

कलाकौशल्य ग्रुपचे काम संपूर्ण महाराष्ट्र मधून चालू आहे. आतापर्यंत जवळपास पाच हजार महिला या ग्रुप मध्ये काम करत आहेत.  ज्या महिला घरी बसून विविध कौशल्यपूर्ण वस्तू बनवितात अशा महिलांसाठी ग्रुप काम करतो. 

बऱ्याच महिलांना उत्कृष्ट अशा वस्तू तर बनविता येतात पण ते प्रॉडक्ट बाजारात कसे आणावे, त्यासाठी काय करावे लागते, मार्केटींग साठी नवीन नवीन पद्धती काय आहेत, त्या सहजपणे कशा वापरू शकतो ही सर्व माहिती इथे मिळू शकते. 

काहीना ट्रेनिंग ची पण गरज असते नवीन शिकण्याची आवड असते पण घरबसल्या ते होत नाही, घरातील विविध कारणांमुळे ते शक्य होत नाही. घरातील विविध कारणांमुळे ते शक्य होत नाही यासाठी सुद्धा अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

त्यासाठी कलाकौशल्य तर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
उदाहरणार्थ कार्यशाळा म्हणजे वर्कशॉप, एक्जीबिशन्स म्हणजे प्रदर्शन 
तसेच मीटिंगमध्ये सर्व महिलांना त्यांच्या शंका, काही अडचणी यावर चर्चा करून त्यावर पर्याय  उपलब्ध करून दिला जातो


आपल्यासाठी संधी !



 कलाकौशल्य तर्फे विविध संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत

 यामध्ये आपण ...
  • आपल्या प्रॉडक्टची विक्री करू शकता 
  • होलसेल मध्ये खरेदी करू शकता 
  • विविध शहरात डिस्ट्रीब्युटर्स घेऊ शकता
  •  आपल्या शहरात वितरक म्हणून काम करू शकता
  • विविध प्रदर्शनांत भाग घेऊ शकता
  • 'वर्क फ्रॉम होम' असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत
  • ऑनलाइन किंवा ऑफलाइन मार्केटिंग करू शकता
  • आणि बरेच काही...


आजच कलाकौशल्य ग्रुपचा एक भाग व्हा!