कलाकौशल्य










अशा महिला की ज्यांच्याकडे सुंदर आकर्षक वस्तू बनविण्याची कला आहे तसेच रांगोळी, मेहेंदी, साहित्य, कला कथा कविता, गायन अशा विविध कलागुण आहेत अशा सर्व महिलांसाठी हा ग्रुप खुला आहे,  त्यामध्ये आम्ही कोणतीही जात धर्म , क्लास पाहिला जात नाही. ग्रुपमध्ये  सहभागी होण्यासाठी कोणतीही फी घेतली जात नाही.  
ज्या महिला ग्रुपमध्ये सामील होतात त्यांच्यासाठी विविध पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत.  
ज्यांना मार्केटिंग जमत नाही / वेळ मिळत नाही, अथवा कोणाला ट्रेनिंग हवे असल्यास , कोणाला whatsapp , fb सुध्दा वापरता येत नाही, तसेच ऑनलाईन चे विविध पर्याय अशा सर्वांची माहिती व मदत कलाकौशल्य करत आहे. 


मुख्य उद्देश : 


आपण महाराष्ट्र मध्ये कोठेही असाल तर घरबसल्या आपल्या कलेला वाव मिळायला हवा, आपली कला इतरांपर्यंत पोहोचायला हवी. त्यासाठी घरीबसून कोणकोणते पर्याय वापरता येतील किंवा कशाची गरज आहे हे कळू शकल्यास त्याप्रमाणे मदत करता येते. 
अर्थात आपणही आमच्या संपर्कात राहणे , विविध विषयावर चर्चा करणे, उपक्रमात भाग घेणे हेही गरजेचं आहे .

_______________________________________________________ 

त्यासाठी कलाकौशल्य तर्फे विविध पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत.
  •  ऑनलाईन आर्ट गॅलरी मध्ये आपण आपले प्रॉडक्टस विक्रीसाठी ठेवू शकता.
  •  फूड प्रॉडक्टस साठी वेगळी ऑनलाईन गॅलरी आहे. 
  • डिरेक्टरी लिस्टिंग द्वारे महाराष्ट्र मधील विविध ठिकाणच्या कलाकारांची माहिती मिळू शकते, 
  • Live / व्हिडीओ द्वारे आपण आपली कला इतरांपर्यंत पोहोचवू शकता 
  •  तसेच डिजिटल मार्केटींग बद्दल daily tips शेअर केल्या जातात.  
  •  रिसेलर्स ना वेळोवेळी नवनवीन प्रॉडक्टस बद्दल माहिती दिली जाते, 
  •  मार्केटिंग साठी fb ग्रुप्स , पेजेस आहेत, whatsapp groups आहेत.  
  •  वेबसाईट, ब्लॉग्ज, इन्स्टाग्राम, telegram अशा विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. 
  •  वयोगट 5 ते 15 साठी सुद्धा विविध उपक्रम घेतले जातात. त्यासाठी फेसबुक पेज उपलब्ध आहे. 
  •  Graphics / web development / design मध्ये आवड असणाऱ्या साठी  विविध पर्याय आहेत.  Graphics /Web Development /Design मधील विविध विषयांचे ऑनलाईन कोर्सेस शिकविले जातात. वेबिनार घेतले जातात.  
  •  Digital Marketing सर्व्हिस दिली जाते .  वेबसाईट , ब्लॉग्ज , गुगल ऍप बनवून दिले जातात.
  •  Coding / programming / game development  मध्ये आवड असणाऱ्यांना सुद्धा पर्याय उपलब्ध आहेत.  विविध विषयांचे ऑनलाईन कोर्सेस शिकविले जातात. वेबिनार घेतले जातात 
  •  प्रत्येकाची आवड लक्षात घेऊन विविध विषयांवरची ईबुक्स आपल्या डिजिटल लायब्ररी मध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक विभागात निवडक ईबुक्स आहेत ज्यांची मूळ किंमत ५०० पासून ते ५००० इतकी आहे. अशी पुस्तके आपणांस फक्त १०० रुपयांत वाचावयास उपलब्ध करून दिलेली आहेत. 
  •  आपण विविध विषयांवर लिहिलेले लेख ब्लॉग सेक्शनमध्ये प्रकाशित केले जातात.
  •  विविध सणावारानुसार वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात.